– खासदार किरसान यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केले मात्र अद्यापही शेतकऱ्यांना धान विक्रीचा मोबदला मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. ही बाब गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना कळताच त्यांनी धानाचे हप्ते तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणही केली आहे.
गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम मागास क्षेत्र असून लोकसभा क्षेत्रातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीव्यतिरिक्त दुसरा कुठलाही मोठा उत्पादनाचा माध्यम त्यांच्या जवळ नाही, विविध बँक आणि इतर माध्यमातून शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात, मात्र शेतीचे पीक निघून धान विकल्या नंतरही अद्याप अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शासनाकडून पैसे येण्यास उशिर होत असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही अशी उत्तरे दिल्या जात आहे, ह्या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांना आपल्याच हक्काच्या पैशासाठी तात्काळत राहावे लागत आहे त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या धानाचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.
जर शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचे हप्ते देण्यास विलंब होत असेल तर शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खासदार डॉ. किरसान यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून दिला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )