उद्या ‘सर्च’ माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात वेदना व्यवस्थापन ओपिडी

190

– मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन व त्यांची टीम करतील रुग्णांची तपासणी
The  गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), २ डिसेंबर : शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते, आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे आणि उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बघता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीला रुग्णांचा प्रतिसाद बघता सर्च येथील माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात उद्या ३ डिसेंबर २०२२ ला वेदना व्यवस्थापन ओपिडी असून ही ओपीडी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सर्च दवाखान्यात होणार आहे.
ह्या ओपीडी मध्ये मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहे. या ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे ,पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल. तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे, पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेचे दुखणे, डोकेदुखी, नागिण(एक त्वचारोग) यामुळे होणार्‍या वेदना व तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर च्या वेदना या सर्वांवर उपचार होईल.

(Gadchiroli News Updates) (The Gadvishva) (Serch Chatgaon) (OPD) (Pain Management OPD at ‘Search’ Maa Danteshwari Hospital tomorrow)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here