७ ऑगस्ट ला लोकशाही दिनाचे आयोजन

124

The गडविश्व
गडचिरोली, ऑगस्ट : शासन परिपत्रकामधील सुचनानुसार लोकशाही दिनाचे आयोजन 07 ऑगस्ट 2023 रोजी (सोमवार) दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.
सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुकास्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर 07 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here