मोबाईल एक्सरे व्हॅन द्वारे क्षयरुग्ण शोधमोहिम

159

The गडविश्व
गडचिरोली, २ ऑगस्ट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत या देशातुन क्षयरोग (टीबी) हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. व ते गाठण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये मोबाईल एक्सरे व्हॅन द्वारे क्षयरुग्ण शोधमोहिम राबविण्यात येत आहे.
क्षयरोगाची निश्चिती व्हावी यासाठी डॉ. रुग्णांना एक्सरे काढण्याचा सल्ला देतात. सरकारी रुग्णालयात व काही ठराविक खाजगी केंद्रामध्ये या सेवा मोफत उपलब्ध आहेत. काही जण डोळेझाक करतात यावर पर्याय म्हणुन गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल, पुराडा, मुरुमगाव, मालेवाडा, वैरागड, कुनघाडा, आमगाव इ. ठिकाणी मोबाईल एक्सरे व्हॅन द्वारे 387 एवढया संशयीत रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. त्यापैकी 51 इतक्या रुग्णांचे निदान होऊन औषधोपचार सुरु करण्यात आले. क्षयरोगाचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करणे शक्य होते. परंतु अनेक जण आजार गंभीर होईपर्यंत त्याकडे पाठ फिरवितात परिणामी रोग वाढण्याची शक्यता असुन त्याचे रुपांतर एमडीआर टीबी सारख्या गंभीर आजारामध्ये होते किंवा रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. तसेच एक क्षयरुग्ण उपचाराविना सुटला तर तो वर्षभरामध्ये 15 नवीन क्षयरुग्ण तयार करीत असतो.
आपल्या भारत देशामध्ये दर दिड मिनिटाला 1 क्षयरुगण मृत्युमुखी पडतो तर दिवसाला 1000 लोक मृत्युमुखी पावतात अशा गंभीर स्वरुपाच्या आाजाराला आळा घालण्यासाठी गावोगावी जाऊन संशयीत क्षयरुग्ण शोधण्यासाठी मोबाईल एक्सरे व्हॅन द्वारे मदत घेतली जात आहे. आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येते की, ज्यांना क्षयरोगाचे लक्षणे जसे की दोन आठवडयाचा खोकला, ताप, वजनात घट होणे, भुक मंदावणे, थुंकीतुन रक्त पडणे, मानेवर गाठी येणे अशा प्रकारचे लक्षणे आढळल्यास त्यांनी थुंकीची तपासणी जवळच्या दवाखान्यात करावी. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी, गडचिरोली डॉ. सचिन आर. हेमके यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here