गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध : आमदार डॉ. देवराव होळी

127

– गडचिरोली येथे गोंड समाज संघटनेच्या वतीने राणी दुर्गावती जयंती समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : मागील १० वर्षापासून आपल्या आमदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण केलेल्या विकास कामामुळे जनतेमध्ये आपली लोकप्रियता वाढत चालली असून एक नवीन राजकीय नेतृत्व उदयास होताना दिसून येत असल्याने आपले विरोधक नवीन राजकीय नेतृत्व निर्माणच होऊ नये म्हणून आपला विरोध करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथे  गोंड समाज संघटनेच्या वतीने आयोजित राणी दुर्गावती जयंती समाज प्रबोधन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
यावेळी मंचावर माजी आमदार हरिराम वरखडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार हिरामण वरखडे, पावीमुरांडा जमीनदार तथा जिल्हा जंगल कामगार सोसायटीचे अध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रमोद खंडाते, प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, आपण सातत्याने विकास कामांचे स्वप्न घेऊन  काम करीत आहोत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये आपण  लोकप्रिय होत असून भविष्यातील सक्षम राजकीय नेतृत्व असल्याचे जनतेला दिसून आले आहे. मात्र आपले विरोधक हे होऊ नये, गडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होवू नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here