आरमोरी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच गायब : माजी आमदार रामकृष्ण मडावी

277

– शहरात भीषण पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा करण्याचा नगरपरिषदेचा निर्णय
The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी (नरेश ढोरे ) : उन्हाळा सुरु होताच शहरात भीषण पाणी टंचाईची झळ पोहचत असून टँकरने पाणीपुरवठा करण्याचा नगरपरिषदेने निर्णय घेतला असून मात्र शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच गायब असल्याचे मत माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवरही प्रश्चचिन्ह व्यक्त केल्या जात आहे.
गेल्या आठ दिवसापासून आरमोरी शहरात तीन दिवसानंतर एक वेळा या पद्धतीने नळाला पाणी सोडण्यात येत होते. त्यातही काही दिवस नळाला येत असलेला पाणी अत्यंत दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याने शहरातील महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा नेला, त्यानंतर आता नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरील सबमर्सिबल पंप विजेच्या कमी अधिक दाबामुळे जळालेले असल्याचे सांगण्यात येत आहे तरी यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने टँकरने शहरात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतांना आजपर्यंत टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे कुठे आढळून आलेले नाही, विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे सबमर्सिबल खराब झाल्याचे बोलले जात असताना माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडवी यांनी वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली असता अभियंतांनी विजेच्या प्रवाहात कुठलाही बिघाड नसल्याचे सांगितले. सदर पाणीपुरवठा योजनेवरील सबमर्सिबल पंप विजेच्या कारणाने जळाले असे कारण सांगुन आपल्या नाकर्तेपणा चा ठपका नगरपरिषदचे अधिकारी व पदाधिकारी विज वितरण कंपनीवर ठेवत आहेत असेही माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी व्यक्त केले आहे.
शहरात सध्या विकासाच्या नावाखाली रस्ते, नाल्या बांधकाम, पथदिवे व इतर कामाकडे नगरपरिषदेचा जास्त कल लागलेला असून आवश्यक असलेला पाणीपुरवठा व आरोग्यासंबंधी समस्या याकडे नगरपरिषद अक्षरशा दुर्लक्ष करीत आहे. आरमोरी शहरात नळाला पुरेसा पाणी मिळत नसल्याने शहरातील नागरिक आपल्या घराशेजारील असलेल्या हातपंप, सार्वजनिक विहिरी या ठिकाणचे पाणी वापरून आपली तहान भागवतांना दिसत आहेत परंतु हात पंप किंवा विहिरीचा पाणी हा आजपर्यंत तिथेच साठवून असल्यामुळे ते हि पाणी वापरण्यायोग्य नसल्याने त्या पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे यासाठी नगरपरिषदेने त्या पाण्याचे परीक्षण करून त्याला शुद्धीकरण करण्यासाठी उपाय योजना करावे अशीही मागणी माजी आमदार डॉ.मडावी यांनी केली. तर आरमोरी शहराजवळून बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या नद्या वाहत असतांना शहरात पाणीटंचाई असणे ही खेदाची बाब आहे असेही ते म्हणाले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl) (Only tankers supplying water in Armory town are missing: Former MLA Ramakrishna Madavi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here