निलेश सातपुते ‘उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित

655

– चंद्रपुर येथे पुरस्काराचे वितरण
The गडविश्व
गडचिरोली, ५ मार्च : माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश सातपुते यांना सन्मानित करण्यात आले. आज रविवार ५ मार्च रोजी चंद्रपुर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले
निलेश सातपुते हे गत २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असून लोकवृत्त न्यूज चे संपादक आहेत व गडचिरोली नामांकित पत्रकार आहे. निष्पक्ष निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, क्रीडा व कृषी साहित्य, धार्मिक, क्षेत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले व अनेक प्रकरणांना वाच्याता फोडली. त्यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणादायी आहे. नुकताच त्यांनी ६ जानेवारी २०२३ ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा येथोचित सत्कार सोहळा व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर परिचर्चा घडवून आणले व डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.
तसेच यावरच न थांबता त्यांनी आपल्या संकल्पनातून डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना एकत्रित आणून त्याकरिता विविध कल्याणकारी योजनेसह विमा कवच व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर महाराष्ट्र अभ्यास दौरा नियोजन करून आयोजन केलेले आहे. कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्येला लढा देण्याचे त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज तर्फे यावर्षीचा डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातून निलेश जीवनदास सातपुते यांना जाहीर केला. सदर पुरस्काराने सन्मानित केल्याने होमदेवजी तुम्मेवार महाराष्ट्र मत न्यूज २४ तास संपादक, मित्रपरिवार, पत्रकार, डिजिटल मीडिया संपादक, व विविध स्तरातून तसेच मीडियामध्ये कार्यरत असलेल्या आदींकडून निलेश सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • अपेक्षित, वंचित, शोषित दिन दुबळ्या साठी काम केले हे माझे मार्गदर्शक मोरेश्वर उद्योजवार ‘खरे वृत्तांत’ न्यूज संपादक व माझे स्नेही सचिन जिवतोडे संपादक ‘The गडविश्व’ न्यूज गडचिरोली यांच्यामुळे शक्य झाले. प्रतिष्ठानाने त्यांच्या कार्याची दखल घेतली याचा मला खूप आनंद झाला. मी या प्रतिष्ठानचा आभारी आहे, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली, हा पुरस्कार मी माझे पूज्य आई वडिलांना अर्पण करतो. हा पुरस्कार मला प्रेरणा देईल.

– निलेश सातपुते
संपादक लोकवृत्त न्यूज पोर्टल
तथा गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राज्य दैनिक बाळकडू

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Nilesh Satpute) ( Digital Media Award) ( Best Digital Media Journalist Award announced to Nilesh Satpute) (chandrpur) ( Nilesh Satpute honored with Outstanding Digital Media Journalist Award)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here