गडचिरोली सर्पमित्र टीम तर्फे नवनियुक्त वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांचे स्वागत

199

The गडविश्व
गडचिरोली, ११ जुलै : गडचिरोली वनसंरक्षक कार्यालयातील वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची बदली व पदस्थापना नागपूर येथे झाल्याने त्यांच्या जागेवर आलेले वनसंरक्षक एस रमेशकुमार यांचे गडचिरोली येथील सर्पमित्र, गिधाडमित्र तथा वन्यजीव रक्षक टीम तर्फ स्वागत करण्यात आले.
रमेशकुमार हे यापूर्वी सामाजिक वनीकरण नागपूर येथे वनसंरक्षक होते. यावेळी सर्पमित्र टीम कडून विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी सर्पमित्र अजय कुकडकर, पंकज फरकाडे, सौरभ सातपुते, चेतन शेंडे, मनोज पिपरे, गुणवंत बाबानवाडे व योगेश हजारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here