पोलीस मदत केंद्र मालेवाडाच्या वतीने लोकसहभागातुन वाचनालयाची उभारणी

573

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १० जुलै : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन द्वारा पोलीस मदत केंद्र मालेवाडा अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. कुमार चिंता सा. ( अपर पोलीस अधीक्षक प्रशासन) अनुज तारे सा. ( अपर पोलीस अधीक्षक अभियान ), यतिश देशमुख सा. ( अपर पोलीस अधीक्षक प्राणहिता) यांच्या संकल्पनेतून साहिल झरकर सा. (उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा) यांच्या मार्गदर्शनाखाली मालेवाडा येथे भगवान बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन सोहळा सोमवार १० जुलै २०२३ रोजी पार पडला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, विशेष अतिथी म्हणून नरेशचंद्र काठोळे (मिशन IAS अमरावती) नंदू नरोटे माजी जि.प. सदस्य, श्रीमती गिताताई कुमरे माजी जि.प. सदस्या, श्रीमती अनुसया पेंदाम सरपंचा ग्रा.पं. मालेवाडा, पोउपनि पाटील (सिव्हीक ॲक्शन गडचिरोली) तसेच पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील सरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शासकिय कार्यालयाचे कर्मचारी प्रतिष्ठित नागरीक, तथा समस्थ ग्रामवासि उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्याच्या प्रास्ताविकेत पोलीस उपनिरीक्षक नारायण बी. राठोड (प्रभारी अधिकारी पोमके मालेवाडा) यांनी वाचनालय स्थापन करण्यामागच्या उद्देशाची माहिती सांगुन युवक-युवतींना अभ्यासाच्या माध्यमातून आपला बौद्धीक विकास साधुन माओवादी विचारसणीपासून दुर राहण्याचे आवाहन केले. नरेशचंद्र काठोळे यांनी स्पर्धा परिक्षेचे महत्व सांगुन वाचनालयाकरीता स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट दिली. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. आमदार कृष्णाजी गजबे यांनी वाचनालयाच्या उभारणीकरीता वेळोवेळी कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास मदत करण्याचे तसेच भविष्यात आमदार निधीतून वाचनालयाच्या उद्धारासाठी मदत करणार असे सांगितले. अपर पोलीस अधीक्षक चिंता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित नागरीक, विद्यार्थी यांना गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत विदेश शिक्षणासाठी, युवक-युवती यांच्या अंगी असलेल्या क्रिडा विषयक कलागुणांना वाव देण्यासाठी असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात येणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच बाळासाहेब शिंदे, विनर्स ॲकेडमी संभाजी नगर (औरंगाबाद) यांनी मालेवाडा येथील वाचनालयात ई-लायब्ररी करीता सहकार्य करून मालेवाडा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन देणार असल्याचे मोबाईलद्वारे संपर्क करून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस शिपाई साजन मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमांचे आभार पोउपनि भारत निकाळजे यांनी मानले. सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील सर्व अधिकारी, अंमलदार तसेच गावातील युवक-युवती, नागरीक यांनी सहकार्य केले.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, malewada police help centre gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here