नर्सेस संघटनेतर्फे नवनियुक्त सिईओ आयुषी सिंह यांचा सत्कार

242

The गडविश्व
गडचिरोली, २ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना गडचिरोली र.न 5712/21 च्या वतीने गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचा सत्कार करण्यात आला.
नुकतेच राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची बदली सोलापूर येथे जिल्हाधिकारीपदी झाली तर त्यांच्या जागेवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पालघर जिल्हयातील जव्हार येथील प्रकल्प अधिकारी सह सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतेच दोन दिवसांपूर्वी आयुषी सिंह यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार स्विकारला असता विविध संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना गडचिरोलीच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती विमल अंबाळकर, सचिव श्रीमती मिनल वाळके, उपाध्यक्ष ममता गेडाम, कार्याध्यक्ष लिहीतकर, कोषाध्यक्षा भारती गौडा, सल्लागार श्रीमती सलाम, श्रीमती परिवीन शेख, तसेच संघटनेच्या सदस्या आरती खडसे, धनश्री गेडाम, व्हि. झेड, तुलावी, स्मिता लोणारे, सुनील खैरे, शोभा गेडाम, पुष्पा राऊत, वंदना सुपाडे, सुलोचना मरस्कोल्हे, विद्या उईके, श्रीमती बायस्कट, इंदिरा सेलोकर, सारीका गेडाम, श्रीमती वर्षा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here