गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनला नवे नेतृत्व ; उदय धकाते व निलेश सातपुते यांची निवड
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा)च्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या संयोजकपदी उदय धकाते आणि निलेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे पाच वर्षांपूर्वी गामा संघटनेची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासूनच संघटनेने सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, पत्रकार परिषदांचे आयोजन आणि लोकहिताच्या विषयांवर सातत्याने वृत्तांकन करून गामा सदस्य पत्रकारांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रशासन आणि समाजासमोर आणले आहेत. सामाजिक अन्याय, विकासकामे, राजकीय घडामोडी तसेच विविध जनसमस्यांवर संघटनेने प्रभावीपणे प्रकाश टाकला असून डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यही केले आहे.
गामा संघटनेच्या कार्याची दखल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली असून सोशल मीडियावरील मोठ्या वाचकवर्गाकडून संघटनेच्या सदस्य पत्रकारांच्या बातम्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अल्पावधीतच गामा संघटनेने जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
नवनियुक्त संयोजक उदय धकाते व निलेश सातपुते यांचे ज्येष्ठ पत्रकार जयंत निमगडे, अनिल बोदलकर, व्यंकटेश दुड्डमवार, सूरज हजारे, कृष्णा वाघाडे, किशोर खेवले, बी. म्हशाखेत्री तसेच एच. जिवतोडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













