गोंड कलार समाजाची नवीन कार्यकारणी घोषित

224

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २८ सप्टेंबर : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा गोंड कलार समाजाची जुनी कार्यकारी पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आल्याने नवीन कार्यकारिणीची गठीत करण्यात आली.
सभा अध्यक्ष पदी रवी मरपलीवार होते. अध्यक्ष म्हणून विठ्ठल गुर्रमवार यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी श्रीनिवास दुल्लमवार, सचिव गणेश बहिरवार,शंकरराव पेदूरवार, सहसचिव गणेश गौंड बहिरवार, कोषाध्यक्ष सुमन गौंड मरपल्लिवार, सदस्य रामलु बालशनिवार, नरेश मारका, व्यंकटेश मोत्कुरवार, नरसिंह जन्नेगणवार, भरत कोंडां, श्रीकांत ओलालवार, महेश श्रीकोटवार, मलेराम वंगावार, प्रवीण गुरमवार, सौ. नीतू कोकुलवार आदींची निवड करण्यात आली. या सर्वांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here