The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : आरमोरी तालुक्यातील डार्ली गावात आरमोरी तालुका चमू व मुक्तिपथ गावसंघटना डार्ली द्वारा नुकतीच मुक्तिपथ-शक्तीपथ महिलांची संघटना गठीत करण्यात आली.
महिलांच्या आरोग्य विषयक समस्ये विषयी महिलांना ज्ञान मिळावे, चर्चा घडून यावी, महिलांना एकत्र येवून संवाद करता यावा. विचार, भावना व्यक्त करता याव्या, सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे, मुक्तिपथ संघटनेतील महिला अधिक सक्षम व्हाव्या, गावाची दारूबंदी टिकून राहावी इत्यादी विविध हेतूने मुक्तिपथ गाव संघटने अंतर्गत महिलांची मुक्तिपथ-शक्तीपथ हि विशेष संघटना डार्ली येथे गावातील महिलांच्या सहभागातून नुकतीच स्थापन करण्यात आली.
बैठकीदरम्यान महिलांच्या आरोग्यविषयक समस्येवर चर्चा करत कमजोरी या विषयाबद्दल महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. संघटना का व कशासाठी याचे महत्व समजावून सांगितले. संघटना काय कृती कार्यक्रम करू शकतील हे महिलांसोबत चर्चा करून ठरविण्यात आले. खेळ व गाण्याच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. तसेच शक्तिपथ स्त्री संघटनेमध्ये गावातील महिला पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष ज्योती अरविंद मडावी, उपाध्यक्ष यमु अनिल उईके तसेच आशा भोजनराव धुर्वे आणि सचिव म्हणून जाशीका महेश मेश्राम यांची निवड करण्यात आली. यावेळी एकूण ५३ महिला उपस्थित होत्या, ज्या या संघटनेच्या सदस्य झाल्या. यासाठी आरमोरी तालुका मुक्तिपथ चमूचे तालुका संघटक विनोद कोहपरे, मनीषा प्रधान, स्वीटी आकरे, दीक्षा टेलकापल्लीलवार इत्यादी सदस्य उपस्थित होते. याचप्रमाणे वडसा मध्ये कुरुड, विसोरा, आरमोरी तालुक्यात डार्ली सह नरोटीमाल व भाकरोंडी, कोरची तालुक्यात कुकडेल, मोहगाव व गणेशपूर, धानोरा मध्ये निमनवाडा व मीचगाव बु., चामोर्शी मध्ये मोहोर्ली, रामाळा व फोकुर्डी, गडचिरोली येथे करपळा, अहेरी तालुक्यात टेकमपल्ली तसेच पुसकपल्ली इत्यादी विविध तालुक्यात विविध गावात मुक्तिपथ गाव संघटना व तालुका चमू यांच्या समन्वयातून मुक्तिपथ शक्तीपथ संघटना स्थापन करण्यात आल्या पदाधिकारी निवडून विविध कृती कार्यक्रम ठरविण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )