गडचिरोली : आत्मसमर्पित ‘रजनी’ ने शेतकऱ्याशी बांधली रेशीमगाठ

2356

– धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : सलग १४ वर्षे नक्षल्यांच्या विविध सशस्त्र नक्षल दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहचलेली जहाल महिला नक्षली रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी (वय २८) वर्ष रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून मागील वर्षी ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी गडचिरोली पोलिस दलासामोर आत्मसमर्पण केले होते. यंदा तिने धाडसी निर्णय घेत
गडचिरोली जिल्ह्रातील शेती करुन सर्व सामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी ( वय २६) रा. एलाराम, पोस्ट-पेठा (देचलीपेठा), तह. अहेरी जि. गडचिरोली याच्याशी रेशीमगाठ बांधली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत १६ ऑगस्ट २०२४ रोजी गडचिरोली शहरातील प्रसिद्ध सेमाना देवस्थान येथे रजनी आणि कैलास लग्नबंधनात अडकले आहे. नवविवाहित जोडप्यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
शासनाने सन २०२५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर जे नक्षली विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करत असते. याचाच एक भाग म्हणून आत्मसमर्पित झालेली जहाल महिला नक्षली रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी याचेसोबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने विवाह संपन्न झाला.
रजनी हिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकुण 11 लाख रुपयांचे इनाम घोषित होते.
आत्मसमर्पण केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करुन घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नीशिल असते. गडचिरोली जिल्ह्रातील शेती करुन सर्व सामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थिती आणि पाठींब्याने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. सदर विवाह सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदरचा विवाह संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी, नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxal )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here