दुर्गम भागातील २१ गावात मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धा

223

– १०६४ स्पर्धकांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, २४ नोव्हेंबर : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या २१ गावांमध्ये मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण १०६४ स्पर्धकांनी सहभाग घेत शक्तिप्रदर्शन केले. सोबतच बैठकीदरम्यान गावातील नागरिकांना जागृत करून अवैध दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले.
अतिदुर्गम भागातील रोपी येथे आयोजित मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेता स्पर्धकांना रोपी इलाखा प्रमुख शत्रूजी नरोटे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यासह एटापल्ली तालुक्यातील २१ गावात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात चोखेवाडा ४० स्पर्धक, भापडा ५६ स्पर्धक, सरखेडा ५३, कुरुमवाडा ७७, वडसा कला ७१, मेंढरी ५९, कर्रेम २५, जवेली म ५२, गुरुपल्ली ८२, तोडसा ५१, एकरां बू. ३४, पैमा २७, तांबडा ५२, जांभीया ५२, टातीगुंडम ५४, डूम्मे ३७, पंदेवाही ४३, चंदनवेली ३५, दोड्डी ७४, उडेरा ३५ अशा एकूण १०६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. अतिदुर्गम २१ गावातील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये ४००० लोकांनी उपस्थिती दर्शविली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे, स्पार्क कार्यकर्ती रुणाली कुमोटी यांनी केले.

#The Gadvishva #Gadchiroli #Muktipath #Marathon #Etapalli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here