राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांशु त्रिवेदी यांच्या निषेधार्थ गडचिरोली काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी निषेध आंदोलन

248

The गडविश्व
गडचिरोल, २४ नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. सोबतच गडचिरोली शहरातही शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने व शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्तरीत्या निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्यपाल हे संविधानिक व घटनात्मक पद असताना देखील राज्यपालाकडून छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले व राज्यातील इतरही महापुरुषांच्या विषयी नेहमी अपवादग्रस्त विधान केल्या जाते हे अतिशय निंदनीय असून भाजप नेते व सरकार मधील लोक त्यांना पाठीशी घालतात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुदाशू त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अपवादग्रस्त विधान केले यांचा निषेध म्हणून यावेढी आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली येथे आंदोलन करताना प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, गडचिरोली शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव शेडमाके, गडचिरोली तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सहकार सेल अध्यक्ष श्यामराव चापले, काँग्रेस नेते हसनअली गीलानी, शंकरराव सालोटकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, अब्दुल पंजवाणी, सुनील चटगुलवार, राजाराम ठाकरे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, देवेंद्र बांबोडे, भूपेंद्र रोहनकर, दीपक रामने, आय बी शेख, सुभाष धाईत, सुधीर बांबोडे, अमित चूधरी, शैलेश शेंडे, खुशाल जेलेवार, प्रशांत शेंडे, सुचित मेश्राम, अविनाश श्रीरामवार, माजिद सय्यद, बंडोपंत चित्तमलवार, मधुकर नेताम, विकास देशमुख जावेद खान सह मोठ्या संख्येने काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व शिवप्रेमी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here