पुन्हा एकदा वाघाचा हल्ला : इसम ठार

1318

– वाघाचे इसमावरील हल्ले थांबता थांबेना
The गडविश्व
ता. प्र / सावली, १४ : तालुक्यातील रूद्रापूर येथील इसम नेहमीप्रमाणे शेतात जात असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली. बाबुराव बुधाजी कांबळे (६५) असे मृतकाचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्यात वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. आठवड्यात सामदा येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताजी असतांनासाज आता पुन्हा रुद्रापूर येथील इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात मात्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मृतकाच्या पश्च्छात बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अशा मृत्युने कुटुंबावर दुखाचा डोंगर पसरलेला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
या दोन महिन्यात वाघाचे मानवावर ४ हल्ले झाले असून त्यामध्ये दोन गंभीर जखमी तर दोघांचा मृत्यु झाला आहे.
वाघाच्या बंदोबस्ती करिता वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना तालुक्यातून पत्र पाठवले असून काय उपाययोजना करतात याकडे लक्ष लागले आहे.

(The Gadvishva ) ( Man was killed in a tiger attack) (Chandrpur) (France vs Morocco) (Vijay Sethupathi) (Meteor shower) (Arsenal vs Milan)  (Saoli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here