-नागरिकांना लेखी निवेदन सादर करण्याचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : पोलीस स्टेशन कोठी, पोलीस उपविभाग भामरागड हद्दीतील फुलनार जंगल परिसरात २७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पोलिस व नक्षलवादी यांच्यातील चकमकीदरम्यान चार नक्षलवादी (एक पुरुष व तीन महिला) ठार झाले होते. या घटनेचा सविस्तर उलगडा करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ही चौकशी उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली अमर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या, घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या किंवा या प्रकरणाशी संबंधित पुरावे, अनुभव अथवा साक्ष असलेल्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्या कार्यालयात सादर करावे.
निवेदन सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर राहून अथवा लेखी स्वरूपात आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या निवेदनात घटनेचे स्वतःच्या पाहिल्याप्रमाणे वर्णन, घटनेपूर्व अथवा घटनेनंतर घडलेल्या संबंधित बाबी, त्याविषयीचे अनुभव, शासकीय यंत्रणेचा सहभाग अथवा प्रतिसाद यांची माहिती तसेच इतर कोणतीही संबंधित माहिती समाविष्ट करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #Bhamragad #PhulnarEncounter #MagisterialInquiry #PoliceAction #NaxalIssue #Theगडविश्व













