ब्रेल लिपीचे जनक कोणास म्हणतात ?

226

विश्व ब्रेल दिवस- लुई ब्रेल जयंती व स्मृतिदिन

_जगभरात आता अंध किंवा दृष्टिहीन मुले ब्रेल पाटीच्या सहाय्याने ब्रेललिपी लिहायला आणि वाचायला शिकतात. ती लिपी लिहायला आणि वाचायला खुप सोपी असून त्यावर अंक लेखनसुद्धा केले जाते. तिचा वापर खुप सोपा, सरल व सहज आहे. त्यांचे जगभरातील अंध आणि दृष्टिहीन लोकांसाठी हे खुप महत्वाचे कार्य आहे. ते हेच लुई ब्रेल एक जगप्रसिद्ध शासत्रज्ञ होऊन गेले. त्यांच्याबद्दल ज्ञानवर्धक सविस्तर माहिती अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींच्या शब्दांतून जरूर वाचा… संपादक._

लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, स्वयंसेवक व शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत व लिपी विकसीत केली. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठी जन्मलेले लुई सगळ्यांचे लाडके होते. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत. चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असत. वडिलांचे छोट्या लुईकडे सतत लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूर ठेवत असत. लहानपणापासून लुई स्वावलंबी होते. ते स्वतःची कामे स्वतःच करीत असत. अभ्यासात लुई हुशार होते, केवळ श्रवणाच्या जोरावर त्यांनी केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. लुई अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यांनी सर्वच विषय विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू ठेवले. आयुष्यभर शिक्षण देण्याचे कार्य करत अनेक विद्यार्थ्यांप्रती त्यांचे मदतीचे हात होते. त्यांनी आपल्या सर्व वस्तू विद्यार्थ्यांना भेट देऊन जगाचा निरोप घेतला होता.
लुई ब्रेल यांचा जन्म कुपव्रे या खेड्यात दि.४ जानेवारी १८०९मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन रेने ब्रेल हे एक कातडी वस्तू तयार करणारे कारागीर होते. लुई ब्रेल यांच्या आईचे नाव मोनिक ब्रेल होते. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी सायमन यांना खुप कष्ट करावे लागत असे. जेव्हा लुई फक्त तीन वर्षाचा होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्यासोबत कामावर घेऊन जात. त्याठिकाणी लुईचे वडील कातडी शिवण्याचे काम करत असत. घोड्याचे खोगीर बनवण्याचे काम करत असत. इ.स.१८१६मध्ये त्यांच्या गावात एक शिक्षक आले, त्यांचे नाव एयबे जॅक पाद्री पेलू असे होते. त्यांनी शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वेगवेगळ्या वस्तूंची ओळख शिकवली. लुई ब्रेल लहान असल्याने ते त्यांच्याजवळ असणार्‍या वस्तूंशी खेळत होते. जसे त्यांचे वडील कामासाठी लोखंडाचे तुकडे, घोड्याचे नाल, कठीण लाकूड, दोर्‍या, चाकू, सुई इत्यादी ठेवत, ते त्या वस्तूंशी खेळत असत.
एकदा असेच खोगीर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी टोकदार आरी खेळताना लुईच्या डोळ्यात घुसली. डोळ्यातून रक्त येऊ लागले. त्याचावर जवळच्या डॉक्टरकडे उपचार केले, परंतु डोळ्याला संसर्ग झाला. एका डोळ्याचा संसर्ग दुसर्‍या डोळ्याला झाला, त्यामुळे ते दृष्टिहीन झाले. लुई ब्रेल लहानपणापासून हुशार होते. त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. ते स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने अनेक वस्तू सहज ओळखत असत. पुढे त्यांना सामान्य शाळेत पाठवण्यात आले. केवळ श्रवण करून त्यांनी आपल्या अभ्यासात प्रगती गाठली. पुढे दोन वर्षांनंतर त्यांना पॅरीसमधील शाळेत घालण्याचे त्यांच्या शिक्षकाने ठरवले. लुई अत्यंत शांत, संयमी, हुशार होते. त्यांचे त्या शाळेत घनिष्ट नाते जोडले गेले. त्यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांनी अंध व्यक्तींसाठी खूप मोठे कार्य केलेले असून आजही लुई ब्रेल यांची अंधासाठी वापरण्यात येणारी ब्रेल लिपी संपूर्ण जगभर वापरण्यात येत आहे. इ.स.१८२१ साली अंधांना लिहाण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे पहिले शस्त्रज्ञ म्हणून लुई ब्रेल यांची जगभरात वेगळी ओळख आहे. त्यांच्या नावावरून या लिपीला ब्रेल लिपी असे नाव दिले गेले. त्यांना ब्रेल लिपीचे जनक म्हणतात. ४ जानेवारीला संपूर्ण जगात जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो. कारण हा दिवस लुई यांचा जन्मदिन आहे. त्यांचे शिक्षक पाद्रेंनी त्यांना पॅरीस येथे अंध मुलांच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. जगातील पहिल्या अंध मुलांच्या शाळेत लुई सर्वात लहान विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, ग्रीक, संगीत, गणित आदी विषय ते सहजपणे शिकले. त्याच शाळेत शिक्षण घेऊन तेथेच शिक्षक म्हणून रुजू झाले. अंध व्यक्तींना वाचण्या-लिहण्यासाठी ब्रेल लिपी हे एकमेव साधन आहे. पंधराव्या वर्षी अंध झालेल्या लुईंनी हाताच्या स्पर्शाने जाणवणार्‍या चिन्हांची निर्मिती केली. हाताने जाणवणार्‍या चिन्हाची पुढे ब्रेल लिपी तयार केली. सन १८५४ मध्ये या लिपीचा प्रचार आणि प्रसार झाला. भारत सरकारने लुई ब्रेल यांच्या जन्म शताब्दीच्या दिवशी सन २००९ साली त्यांचे नाणे प्रसिद्ध केले. ब्रेल लिपीमध्ये एकूण सहा ठिबक्यांचा सेट असतो. खोलगट आणि फुगीर ठिबक्यांच्या सहय्याने हे चिन्ह बनवले जातात, त्याचा हाताला स्पर्श जाणवतो. हे ठिबके कधी कागदाच्या वरील बाजूला तर कधी खालील बाजूस जाणवतात. ही लिपी लिहण्यासाठी ब्रेल पाटी विकसित करण्यात आलेली आहे.
जगभरात आता अंध किंवा दृष्टिहीन मुले ब्रेल पाटीच्या सहाय्याने ब्रेललिपी लिहायला आणि वाचायला शिकतात. ती लिपी लिहायला आणि वाचायला खुप सोपी असून त्यावर अंक लेखनसुद्धा केले जाते. तिचा वापर खुप सोपा, सरल व सहज आहे. त्यांचे जगभरातील अंध आणि दृष्टिहीन लोकांसाठी हे खुप महत्वाचे कार्य आहे. ते हेच लुई ब्रेल एक जगप्रसिद्ध शासत्रज्ञ होऊन गेले. या महान संशोधकाचा मृत्यू दि.६ जानेवारी १८५२मध्ये झाला.
!! लुई ब्रेल यांच्या अविस्मरणीय कामगिरीस अदबीने सॅल्यूटऽऽऽ.. !!

अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजी.
रामनगर, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॅप- ९४२३७१४८८३.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here