दारूविक्रेत्यांना शासकीय योजनांपासून ठेवणार वंचित

294

– दिभना ग्रामसभेचा निर्णय, एसडीपीओ, ठाणेदारांना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली,६ डिसेंबर : तालुक्यातील दिभना ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत अवैध दारूविक्री बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मूजोर विक्रेत्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे ठरवण्यात आले.
या ग्रामसभेला सरपंच रमेश गुरूनुले ,मुक्तिपत दारूबंदी समिती अध्यक्ष सिंधुताई नैताम , लता उईके, मैनाबाई लेनगुरे, वैशाली जेंगठे, शोभा नैताम , त.मु.स.अध्यक्ष शंकर वाडगुरे ,शा.व्य.स.अध्यक्ष विलास जेंगठे,ग्रा.प.सदस्य धनराज जेंगटे, त.मू.स.उपाध्यक्ष बालाजी जेंगठे , उपसरपंच उषा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ज्योती नैताम, चंदा जेंगठे, ज्योती जेंगठे, राजू जेंगठे, रत्नाकर जेंगठे, रामाजी शेंडे, रवींद्र मांडाले, मारोती जेंगठे, भोजराज जेंगठे, मारोती मोहुर्ले, गुरुदेव गेडाम, मुक्तिपथचे अमोल वाकुडकर, रेवणाथ मेश्राम, स्विटी आकरे , सर्व बचत गट महिला, पुरुष, ग्रामपंचायत सदस्य, सर्व समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते.
सभेनंतर ग्रामपंचायत, ग्रामपंचायत समिती व गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशनला भेट देऊन निवेदन सादर केले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यापुढे अवैध दारूविक्रीमूळे होणाऱ्या समस्या मांडल्या. संबंधित दारू विक्रेत्यांना वारंवार सूचना करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. आता ग्रामसभेने ठराव घेऊन दारूमुक्त गाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here