– दिवाणी न्यायाधीस कनिष्ट स्तर तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष मेंढे यांचे प्रतिपादन
The गडविश्व
कुरखेडा, ६ डिसेंबर : संविधान दिनानिमित्य २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा निमित्य “एकजूट व्हा ! महिला व मुलीवरील होणारे अत्याचार संपवा” या विषयावर हा पंधरवाडा संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. त्यामित्य व ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्य रविवार ४ डिसेंबर २०२२ ला आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या ज्ञानज्योती स्पर्धाग्राम सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक दिवाणी न्यायाधीस कनिष्ट स्तर तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष मेंढे ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था कुरखेडा संयोजक डॉ. सतीश गोगुलवार, तसेच तालुका अपंग संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद बन्सोड व संगती शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका श्रीमती शालिनी अंबादे उपस्थित होत्या.
मेंढे पुढे म्हणले भाषणात भारतीय राज्यघटनेचे महत्व सांगून जनतेला असलेले अधिकार यासोबतच व्यक्तींचे कर्तव्य यावर भर दिले. संविधान निर्मितीतून भारताने पारंपारिक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमतेकडून स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय हे तत्व स्वीकारून समान संधीतून सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार केला. परंतु त्यावर अनेक कारणांमुळे पूर्णपणे अंमलबजावणी होवू शकली नाही. त्यामुळे वंचित समूह, महिला, दिव्यांग व्यक्ती हे अजूनही विकासाच्या प्रक्रियेत मागेच आहेत. त्यावर काम करण्याची आज अत्यंत निकडीची गरज आहे. हे करताना charity च्या नाही तर empathy च्या दृष्टीकोनातून विचार आणि प्रयत्न केले पाहिजे. हे बोलत असतानाच संसाधानाचे समान वितरण, नैसर्गिक संसाधानांवरील मालकी आणि आरक्षणातून मिळणाऱ्या संधी यावर भाष्य करीत असतानाच कायद्याची असलेली चौकट आणि मर्यादा याकडेही उपस्थितांचे लक्ष वेधले. आज संर्वांना सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे स्वावलंबी आनंदी जीवन जगायला मिळणे हे त्यांचे हक्क आहे त्याकडे आपण काम केले पाहिजे.
डॉ. सतीश गोगुलवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचा आधार घेत संस्था गडचिरोली जिल्हयात करीत असलेल्या कामातील दृष्टिकोन कसा समुदायांना स्वयंसहाय्यता आणि स्वशासनातून स्वतःचा विकास करण्यात प्रोत्साहित करतो याबाबत सांगितले. दिव्यांगांच्या बाबतीत बोलताना दिव्यांगांसोबत काम करताना त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना संधी देण्याची गरज व्यक्त केली. संस्था संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांना संघटीत करून त्यांना कायदे आणि योजना यावर मार्गदर्शन करीत आहे. तसेच कौशल विकास आणि उद्यमशीलता विकास सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करीत आहे. प्रल्हाद बन्सोड यांनी तालुका अपंग संघटना कुरखेडा च्या कामाची माहिती दिली तर संगती शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका श्रीमती शालिनी अंबादे यांनी दिव्यांगांनी एकत्र येत का व कशा पद्धतीने कंपनीची स्थापना केली आणि पुढे त्यांचा आर्थिक विकासाचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची प्रस्तावना वाचन करून करण्यात आली. त्यानंतर मुकेश शेंडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यांनी सांगितले कि, सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर महिलावरील अत्याचार बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. अशा स्थितीत समाजाला जागृत आणि संवेदनशील बनविण्याची गरज असून या पंधरवाडयांच्या अनुषंगाने आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था हि प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाचे संचालनयशवंत पाटणकर, सचिव, विदर्भ विकलांग संघटना यांनी केले तर श्रीमती भरती नंदेश्वर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती. संगिता तुमडे, सुष्मिता हेपट तसेच संघटनेचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.
