समाजातील तरुणांनी व्यसन आणि फॅशन पासून दूर राहावे : चौके

1132

– बांद्रा येथील नागदिवाळी कार्यक्रमात आवाहन
The गडविश्व
बांद्रा (वरोरा), ६ डिसेंबर : आदिवासी माना समाज अनेक समस्यांनी ग्रासलेला असून आर्थिक संकटात सापडलेला आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर व्यसन आणि फॅशन पासून समाज बांधवांनी व विशेषता तरुणांनी यापासून दूर राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चौके यांनी केले. मंगळवार ६ डिसेंबर २०२२ रोजी माना जमात बांधव व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने वरोरा तालुक्यातील बांद्रा येथे आयोजित नागदिवाळी (Nagdiwali) महोत्सवात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र धनगर समाज अध्यक्ष वासुदेवजी आस्कर, सरपंचा जयाताई चिंचोलकर, गावातील ज्येष्ठ नागरिक देवरावजी दडमल, पांडुरंग ढोक व ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे उपस्थित होते.
नागदिवाळी हा माना जमातीचा महत्त्वाचा सण असून गावागावात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी बांद्रा येथे नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातील प्रबोधनाच्या कार्यक्रमात बोलताना चौके यांनी जमातीच्या संस्कृती, इतिहास आणि समस्यांविषयी सखोल मांडणी केली. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाज बांधवांना पटवून दिले. तसेच समाजाला विकास करायचा असेल तर अंधश्रद्धा, कर्मकांड, व्यसन व फॅशन सोडून शिक्षणाची वाट निवडावी लागेल, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. सोबतच विद्यार्थी संघटनेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या मॅजिकसारखे उपक्रमाला मदत करावी तसेच माना जमात विकास संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या वस्तीगृहाच्या कामाला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या उत्सवादरम्यान आदिवासी दैवतांची पारंपरिक मुठपूजा, खनपूजा करण्यात आली. तसेच मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरंजना ननावरे, हर्षल दडमल, रोशन दडमल, विशाल दडमल, सुचिता ननावरे, देवांशु ढोणे, आरती वाघ, मोहन मगरे, सौरभ मगरे, भास्कर मगरे, अविनाश काळमेगे, शुभम दोहतरे, रोशन मगरे, सुषमा दडमल, सुरज मगरे, प्रतीक दडमल, आचल दडमल व गावातील सल्लागार मंडळी तसेच समाज बांधवांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे संचालन सुषमा दडमल यांनी केले तर आभार निकिता ननावरे यांनी मानले.

(The Gadvishva) (the youthof the society should stay away from addiction and fashion) (Chandrapur News Updates) (Nagdiwali)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here