गडचिरोली पोलीस दलाच्या शांतता रॅलीत हजारो नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

478

– पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शांतता रॅलीचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), ६ डिसेंबर : जिल्हयातील नागरिकांना विकासापासुन वंचित ठेवुन, बळजबरीने पीएलजीए सप्ताह पाळावयास भाग पाडणाऱ्या नक्षल्यांविरोधात पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, एटापल्लीच्या वतीने मंगळवार ०६ डिसेंबर २०२२ रोजी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये हजारो नागिरकांनी उत्स्फुर्त सहभाग दर्शविला.
सदर शांतता रॅली ही सकाळी ९.३० वा. उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयापासून शहीद चौक, शिवाजी चौक, बुद्ध विहार, इंदीरा गांधी चौक या मार्गाने निघाली. या रॅलीकरिता नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडता गावातील प्रतीष्ठित नागरिक, शालेय मुले, महिला तसेच इतर विभागाचे अधिकारी / कर्मचारी असे दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. सदर रॅलीला अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सा. यांनी हिरवा झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली व संपूर्ण रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविला.
रॅलीदरम्यान सर्व सहभागी नागरिकांनी बुद्धविहार चौकात संविधानाचे वाचन केले, तसेच रॅलीरम्यान चौकाचौकात वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत, नृत्य कार्यक्रम व इतर विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी काळ्याफिती लावून तसेच नक्षलविरोधी पॉम्प्लेट्स, पोस्टर्स व बॅनर्स लावुन नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा निषेध केला. रॅली दरम्यान नागरिकांकडून विविध प्रकारच्या नक्षलवाद विरोधी घोषणा देण्यात आल्या. दुपारी १.३० वा. परत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय एटापल्ली या ठिकाणी सदर शांतता रॅलीची सांगता करण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन, नृत्य स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
सदर रॅली पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, (अहेरी) यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
सदर शांतता रॅलीच्या यशस्वीतेकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील अधिकारी व अंमलदार, प्रभारी अधिकारी, पोस्टे एटापल्ली श्री. विजयानंद पाटील, सपोनि. मंदार पुरी, पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोउपनि परमेश्वर गरकल, मपोउपनि सविता काळे, मपोउपनि अश्विनी नागरगोजे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

(The Gadvisha) (Gadchiroli Police) (Gadchiroli News Updates) ( Enthusiastic participation of thousands of citizens in the peace rally of Gadchiroli Police Force)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here