– गाव संघटनेचा यशस्वी लढा
The गडविश्व
गडचिरोली, १४ जानेवारी : कुरखेडा तालुक्यातील मोहगाव येथील अवैध दारूविक्री मागील पाच वर्षांपासून बंद आहे. मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेने केलेल्या अथक परिश्रमामुळे हे गाव दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले.
मोहगाव हे गाव कुरखेडा शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असून सोनसरी या ग्रामपंचायत अंतर्गत येतो. गावाची साधारणत: लोकसंख्या ३००-३५० दरम्यान आहेत. आदिवासी बहुल गाव असल्याने सुरुवातीला संपूर्ण गावात मोहाची दारू विक्री सुरू होती. गावातील परिस्थिति खराब होत गेली. गावात महिलाना त्रास वाढला व महिलांनी एकत्रित येत गाव संघटन तयार करून मुक्तिपथ च्या मदतीने गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. गावात कोणीपण दारू विक्री करताना आढळला तर त्याला गावातून बहिष्कृत करण्यात येईल. असा मोठा निर्णयही त्यावेळी घेण्यात आला. गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत संपूर्ण विक्रेत्याचे मडके फोडून त्यांच्याकडून दारू न विकण्याची ग्वाही घेतली. आजघडीला संपूर्ण गावातील दारू विक्री बंद आहे. गाव संघटनेच्या महिलांनी गावशेजारी असलेल्या गावातील दारूविक्री बंद करण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू केला आहे. अशा प्रकारे गेल्या ५ वर्षापासून गावातील दारू विक्री पूर्णतः बंद आहे. गाव सदैव दारूमुक्त ठेवण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेचे अध्यक्ष सिताबाई घावडे, पोलिस पाटील दामजी हलामी, गाव संघटनेचे सदस्य व मुक्तीपथ तालुका टीम प्रयत्नरत आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Napoli vs Juventus) (Aston Villa vs Leeds United) (Pakistan vs New Zealand) (Hockey World Cup 2023) (Elvis Presley)