गडचिरोली : सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

1854

– ७५ हजारांची स्विकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली, १३ जानेवारी : सिमेंट काँक्रीट रोडच्या बांधकामाच्या चेकवर स्वाक्षरी करून देण्याच्या कामाकरिता मुरूगांव ता.धानोरा जि.गडचिरोली येथील सरपंच मारोती रावजी गेडाम (५०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ७५ हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रादर यांनी ग्रामपंचायत मुरूगांव अंतर्गत कोकडकसा समाजमंदीर ते साधू पदा यांच्या घरापर्यंतचे सीसी रोडचे बांधकाम पूर्ण केले होते. सदर रोडच्या बांधकामाच्या चेकवर स्वाक्षरी करून देण्याच्या कामाकरिता मुरूगांव चे सरपंच मारोती गेडाम याने ९० हजार रूपये लाच रकमेची पंचसाक्षीदारासह मागणी करून तडजोडीअंती ७५ हजार रुपये गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रस्त्याच्या बाजूला शुक्रवार १३ जानेवारी ला स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी सरपंच मारोती गेडाम वर गडचिरोली पोलीस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या पर्यवेक्षणात पोनि शिवाजी राठोड, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, नापोशी राजू पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोळे, किशोर जौजारकर, पोशि संदीप घोरमोडे, किशोर ठाकूर, संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसाके, चापोहवा तुळशीराम नवघरे यांनी केली.

(The Gadvishva) (Gadchiroli ACB Trap) (Sarpanch) (Gadchiroli News Updates) (Police) (Napoli vs Juventus) (Aston Villa vs Leeds United) (Hockey World Cup 2023) (Elvis Presley)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here