The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानती हत्तींचा दहशतवादी ‘कमबॅक’ दिसून येत आहे. कुरखेडा तालुक्यातील वासी-कोसी परिसरात दोन रानहत्तींचा मुक्त वावर पाहायला मिळत असून, तेंदूपत्ता संकलन हंगामात काम करणारे हजारो मजूर दहशतीत सापडले आहेत.
हत्तींच्या उपस्थितीची माहिती मंगळवारी सकाळी मिळाली आणि त्यानंतर जंगलात एकच खळबळ उडाली. मोबाईल व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, #ElephantAlert आणि #GadchiroliTrending हे हॅशटॅग्स ट्रेंड करत आहेत.
दरम्यान वनविभागाने जंगल परिसरात गस्त वाढवली असून, नागरिकांना आणि मजुरांना जंगलात एकट्याने न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. हत्तींचा ट्रॅकिंगसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन हा प्रमुख हंगाम असतो, ज्यामुळे हजारो कुटुंबांचे पोट भरते. मात्र, हत्तींच्या वावरामुळे अनेक मजूर जंगलात जाण्यास नकार देत आहेत. परिणामी, संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वनविभाग आणि महसूल यंत्रणेने मान्य केली आहे.
सुमारे ८ महिन्यांपूर्वी कुरखेडा तालुक्यातून निघून गेलेले हे हत्ती पुन्हा परतल्याने परिसरात चिंतेचं वातावरण आहे. हे हत्ती कर्नाटक किंवा छत्तीसगडच्या जंगलातून आले असावेत, असा अंदाज आहे.

#gadchirolinews #thegdv #thegadvishva #kukhedanews
Gadchiroli Elephant Attack, Tendupatta Season Danger, Elephant Movement in Maharashtra, Gadchiroli Jungle Alert, Forest News India