कुरखेडा : अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षक गंभीर जखमी

720

– विद्याभारती महाविद्यालया जवळ झाला अपघात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ११ फेब्रुवारी : येथील वडसा मार्गावर असलेल्या विद्याभारती महाविद्यालय जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
भुनेश्वर लिल्हारे (३८) असे गंभीर जखमी असलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शिक्षक भुलेश्वर लिल्हारे हे कुरखेडा येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमीप्रमाणे चिखली येथून कुरखेडा येथे एम एच ३३ एन ७२०७ क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना सकाळच्या सुमारास विद्याभारती महाविद्यालय जवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. कुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते शाहेजाद हाशमी व त्यांचे सहकारी यांना सदर घटनेची माहिती मिळतात त्यांनी एका खाजगी वाहनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असता रुग्णवाहिकेतून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोचते करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अति गंभीर स्थितीमध्ये रुग्णाला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिल्याने रुग्णालयात पोहोचलेल्या नातेवाईकांनी त्यांना येथील रुग्णवाहिकेच्या मदतीने नागपूरकडे उपचाराकरिता नेल्याचे कळते. भुनेश्वर लिल्हारे हे येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून ते नित्यप्रमाणे चिखली स्वगाव येथून कुरखेडाला शाळेत जाण्यासाठी निघाले होते अशी माहिती आहे.
अपघात झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी कोणीही समोर येत नव्हता परंतु मोबाईलवर सदर घटनेची चित्रीकरण करण्यासाठी सगळे आतुर असल्याचे घटनास्थळी पाहायला मिळाले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The GDV )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here