कुरखेडा : प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून, अपघाताचा बनाव उघड

273

कुरखेडा : प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून, अपघाताचा बनाव उघड
– नववर्षाच्या पूर्वसंध्येला थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३१ : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच कुरखेडा शहरात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून करून तो अपघात असल्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास अटक केली आहे. या खळबळजनक हत्याकांडाचा पर्दाफाश झाल्याने शहरात भीती व चर्चेचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवानंद सूर्यभान डोंगरावर (वय ३३, रा. गेवर्धा) याचा काही वर्षांपूर्वी रेखा (वय २८) हिच्याशी विवाह झाला होता. दोघे कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. विवाहानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती असून दरम्यान रेखा हिचे विश्वभूषण सांगोळे (वय २५, रा. भरनुली) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
३० डिसेंबर रोजी रात्री पती-पत्नीमध्ये घरातच जोरदार भांडण झाले. या वादातूनच पत्नी रेखा हिने आपल्या प्रियकर विश्वा याच्या मदतीने धारदार शस्त्राने पती देवानंद याची निर्घृण हत्या केली. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरून सती नदी पुलाजवळ नेऊन टाकला. बाजूलाच दुचाकी पाडून अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला.
मात्र, मृतदेह नेण्यात आलेल्या मार्गावर आढळलेले रक्ताचे डाग, घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. शवविच्छेदन अहवालानंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. सखोल तपासात पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग उघडकीस आला.
त्यानंतर पोलिसांनी कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे गाठून आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा यांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या धक्कादायक हत्याकांडामुळे नववर्षाच्या स्वागताऐवजी कुरखेडा शहरात खळबळ, संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #KurkhendaCrime #MurderCase #WifeLoverMurder #CrimeNews
#GadchiroliNews #KurkhendaNews #BreakingNews
#NewYearEveCrime #MurderExposed #PoliceInvestigation #MarathiNews #CrimeReport #TrueCrimeIndia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here