The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०५ : स्थानिक नगरपंचायत अंतर्गत पथ विक्रेता संघाचा खुल्या गटातील २ जागेकरीता आज घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष निवडणूकीत वैभव बंसोड व अंकूल इंकने यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतचे मुख्याधिकारी पंकज गावंडे यांनी जबाबदारी पार पाडली.
पथविक्रेता संघाचा ८ सदस्यीय असलेल्या समीतीवर यापूर्वीच खुला महिला गटातून चंन्द्रीका नेवारे, इतर मागास वर्गीय गटातून रमेश रासेकर, अल्पसंख्यक गटातून अशपाक खान, अनूसूचित जमाती गटातून रामचंद्र कूंभरे हे अविरोध निवडून आले आहे तर विकलांग महिला राखीव गट व अनूसूचित जाति महिला गटातून कूणीच नामांकन दाखल न केल्याने या जागा रिक्त आहेत तर खूला प्रवर्गाचा २ जागेकरीता घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष निवडणूकीत ४ उमेदवार होते. यावेळी एकूण ५६ मतदारापैकी ५३ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला ५ मते अवैध ठरली. वैध ४८ मतापैकी अंकूल इंकने यांना ३६ तर वैभव बंसोड याना ३४ मते मिळाल्याने त्याना विजयी घोषित करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #loksabhaelection2024 #election2024 )