कुरखेडा : बेपत्ता तरुणाचा जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

39

कुरखेडा : बेपत्ता तरुणाचा जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
– दोन दिवसांपासून होता बेपत्ता
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०७ : तालुक्यातील मौशी येथील रहिवासी असलेले अनिल बाबूराव मडावी (वय ३२) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मडावी हे रविवार दुपारपासून घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली होती. अखेर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डोंगराजवळील बंधाऱ्याशेजारी असलेल्या जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठवला आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनिल मदावी यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार मडावी. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here