कुरखेडा : विवाहित महिलेने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

1377

-कारण अस्पष्ट
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २६ : तालुक्यातील बांधगाव येथील विवाहित महिलेने घरातच स्वयंपाक खोलीच्या दरवाज्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपाविल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. प्रतिभा गिरीधर राणे (वय ३०) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्रतिभा ही सकाळच्या सुमारास घरातील स्वयंपाक खोलीच्या दरवाजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे कळते. गळफास घेतांना घरी कोणीही उपस्थित नव्हते काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. प्रतिभा ने गळफास का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र कौटुंबिक कारणावरून तिने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
(#thegev #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #purada )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here