‘सर्च’मध्ये होणार तरुणांसाठी ‘कृती निर्माण’ शिबीर

123

The गडविश्व
गडचिरोली, ६ जून : पद्मश्री डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या ‘सर्च’(चातगाव, धानोरा रोड) या संस्थेचा तरुणांच्या विकासासाठी काम करणारा ‘निर्माण’ हा उपक्रम २००६ पासून कार्यरत आहे. तरुण-तरुणींना सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील करणं तसंच त्यांच्या विकासासाठी त्यांना मार्गदर्शन करणं ही ‘निर्माण’ची प्रमुख ध्येय आहेत. यासाठी जून २०२३ मध्ये ‘कृती निर्माण’ शिबीर आयोजित केले जाणार आहे.

या’ आहेत शिबिरांच्या तारखा

जून १०, २०२३ (सायंकाळी ४) – जून १४, २०२३ (दुपारी १)
जून २४, २०२३ (सायंकाळी ४) – जून २८, २०२३ (दुपारी १)
या शिबिरांसाठी १८ ते २८ वयोगटातील तरुण-तरुणी केवळ नोंदणी करून कोणत्याही निवड प्रक्रियेशिवाय सहभागी होऊ शकतात.
तरुणांना निवडक सामाजिक प्रश्नांविषयी जागरूक करणं, सामाजिक बदलाची उदाहरणे समजून घेणं तसेच तरुणांना त्यांच्या स्वयं-विकासासाठी मार्गदर्शन करणं ही या शिबिराची उद्दिष्टे आहेत. या शिबिरातील विविध सत्र ही युवांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाला चालना देतील अशा प्रकारे तयार केलेली आहेत. ‘पर्पज’ (Purpose) आर्थिक स्वावलंबन, समविचारी मित्रांचा गट, यूथ फ्लारिशिंग, पर्यावरणस्नेही जीवन आणि व्यसनांविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन यांचेदेखील महत्त्व या शिबिरात अधोरेखित होते.
आतापर्यंत झालेल्या ‘कृती निर्माण’च्या ८ शिबिरांत महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांतून २८१ युवा सहभागी झाले आहेत. विशेषतः आतापर्यंतच्या शिबिरार्थींमध्ये १०१ शिबिरार्थी हे गडचिरोली (६५), चंद्रपूर (३६) या जिल्ह्यांतले आहेत तर एकूण २०१ शिबिरार्थी हे विदर्भातले आहेत. यांतील अनेक युवांनी स्वतःचे शिक्षण वा नोकरी सांभाळून वेळोवेळी वेगवेगळ्या कृतींतून सामाजिक योगदान दिले आहे. अवकाळी पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान, गावांत वाढणारे वाघांचे हल्ले, अपुरी पडणारी आरोग्य व्यवस्था अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांसाठी सामाजिक योगदान द्यायची इच्छा असणाऱ्या युवांनी अवश्य या शिबिरांत सहभागी व्हावे हे आवाहन करण्यात येत आहे.
वरील शिबिरे धानोरा रोडवरील ‘सर्च’चे कॅम्पस असलेल्या ‘शोधग्राम’ येथेच होणार आहेत. या शिबिरांत सहभागी होण्यासाठी तरुणांनी ८७६७६८०५०८ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here