The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ६ जून : उन्हाळ्यामुळे रक्तदात्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून उप-जिल्हा रुग्णालय आरमोरी येथे रक्तदात्यांच्या सोईकरिता स्थानिक लोकांसाठी ४ जून रोजी ‘ स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ द्वारा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.
यात केशवंत कवंडर, मुख्याध्यापक, पॅराडाईज कॉन्व्हेंट, संजय सातपुते, सुरज प्रधान, वेणूनाथ ठाकरे, आकाश नारनवरे, प्रवीण कांबळे, सुरज तितिरमारे, त्रिदेव जांभुळे, सौरभ माकडे, निलेश बोदरे, सारंग वरंभे, वेदांत मेहता, विवेक खापरे, अंकुश दुमाने, प्रणय जनबंधु, विशाल बुराडे, प्रकाश मैंद, भारत बोकडे, श्रीकांत राऊत, अमोल भुते, मनीष सहारे, ज्ञानेश्वर देवळकर यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
यावेळी उप-जिल्हा रुग्णालयातील डॉ. अमोल धात्रक, निकेसर सिस्टर, गौरी साळवे, आशिक वासनिक रक्तदान शिबिरात प्रामुख्याने उपस्थित होते. तर रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा रक्तपेढीतील डॉ. गरिमा BTO, सतीश तडकलावार, निलेश सोनवाने, सुरज चांदेकर, वसंत न्हाणे यांचे सहकार्य लाभले. चारुदत्त राऊत, अध्यक्ष, स्वयं रक्तदाता जिल्हा समिती, गडचिरोली, यांनी रक्तदान शिबिर सफल करण्यात परिश्रम घेतले.