कोरची : बेडगाव नजीक ट्रॅव्हल्स पलटली, १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी

2176

– उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल
The गडविश्व
कोरची, २५ नोव्हेंबर : कोटगुल येथून कोरची मार्गे वडसा (देसाईगंज) प्रवासी घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बेडगाव नजीक रस्त्याच्या कडले पलटून अपघात झाल्याची घटना आज २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुुमारास घडली. सदर अपघातात १५ च्या वर जखमी असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार, कोटगुल येथून सकाळच्या सुमारास कोरची मार्गे वडसा (देसाईगंज) जाणारी एम.एच. ४० एन १०१४ क्रमांकाची ट्रॅव्हल्स ही प्रवाशांना घेवून जात होती. दरम्यान कोरची येथून वडसा येथे जात असतांना बेडगाव येथील तलावानजीच्या मोडीवर रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स पलटली. या अपघाात १५ पेक्षा अधिकजन जखमी असल्याची माहीती कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी ‘The गडविश्व’ शी बोलतांना दिली.
धर्मेंद्र फुलारे असे ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कळू शकले नाही. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. अपघाताची माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. जखमींना ग्रामीण रूग्णालय कोरची येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास कोरची पोलीस करीत आहे.

अपघातात ४ प्रवासी गंभीर जखमी, दोन गर्भवती महिला व अडीच वर्षाच्या बालकाचा समावेश

या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून त्यात अडीच वर्षांचा बालक व दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे तर ४ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे.
अपघातात श्यामलाल पुरमे (६५) सोनपूर, ललिता पडोटी (४०) सोनपूर, अंबरीबाई टेंभुळकर(३६ ), दीपिका शिकारी (२५) कोटगुल, रामलाल शिकारी(४०) कोटगुल, अरमान शिकारी (अडीच वर्ष) कोटगुल, रचना शिकारी (७) कोटगुल, नंदिनी शिकारी (३) कोटगुल, कुमारी गावडे (३०) नांडळी, निकिता टेंभुळकर (२१) बोरी, हिलम मडावी (२१) मोहगाव, मनोज मडावी (२५) मोहगाव, रामचंद्र टेंभुळकर (७५) बेडगाव, जयाबाई धुर्वे (७०) कुरखेडा, संताबाई मडावी (३५) कोरची, आनंदराव मरापे (५०) कोरची असे जखमींची नावे असून यातील दीपिका शिकारी, आनंद मरापे, अमरी बाई टेंभुर्ण, निकिता टेंभुर्ण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. ©©©

#The Gadvishva #korchi #Gadchiroli #Bedgao #wadsa #Desaiganj #Travels Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here