– सावित्रीच्या लेकींना मिळाल्या सायकली
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २५ नोव्हेंबर : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींना आज २३ नोव्हेंबर २०२२ ला गटशिक्षणाधिकारी वि.आर. आरवेली यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.
धानोरा जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या (वर्ग ५ ते १० वि ) परंतु बाहेर गावाहून ये जा करणाऱ्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत २० मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. सदर मुलींना प्रवास करण्यासाठी सुखकर व्हावे, शिक्षणात कोणत्याही पद्धतीचा खंड पडू नये, प्रवासा अभावी शिक्षणात खंड पडू नये याकरिता शासनाने मानव विकास मिशन सुरू केले आहे .ज्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मुलींना शासन सायकल उपलब्ध करून देते . अशाच धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात शिक्षण घेणाऱ्या ऐकून २० मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर खोबरे, प्राचार्य डी. टी. कोहाडे, प्रशांत साळवे, तोटावर, रजनी मडावी, पठाण, बादल वरगंटीवार व शाळेतील इतर कर्मचारी उपस्थित होते.
