जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी जाणून घेतल्या मरपल्ली येथील समस्या

573

– विविध विषयांवर चर्चा
The गडविश्व
अहेरी, २५ नोव्हेंबर : तालुक्यातील मरपल्ली येथील जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांशी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान ग्राम पंचायत कार्यालय मरपली अंतर्गत येत असलेल्या मरपली, भास्वापूर, करंचा, गावातील विविध समस्या निर्माण झाले आहेत. पाण्याची, गली रस्ते, नाली व विद्युत खांब तसेच तलाव आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनि सांगितले. यावेळी जि.प.माजी अध्यक्ष यांनी सांगितले कि, आपण या क्षेत्रातून पहिल्यादा निवडुन दिले त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघाकडून माझे सहकारी बंधु माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांना निवडुन दिले असल्याने मी जि.प.अध्यक्ष या नात्याने रेपनपली-उमानूर क्षेत्रात जास्तीत जास्त निधी देवून या परिसराच्या विकास करण्यासाठी प्रयत्न केले असून भरपूर कामे सुरू आहेत. मात्र उर्वरित समस्याच्या निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर आहो असे सांगितले.
या चर्चा सभेला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी पंचायत समिती सदस्या सौ.शारदा कोरेत, ग्राम पंचायत सदस्या सुनंदा आत्राम, माजी सरपंच हनमंतू कोरेत, माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रतिष्ठित नागरिक निलेश कूड़मेथे, बापू बेडकी, व्येंकटी कोंडागूर्ले, लचया सिडाम, शंकर कोंडागूर्ले, दिकोंडा व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here