गडचिरोली : गावा-गावात मिळतो व्यसन उपचार

226

– ५१ रुग्णांनी घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली, २५ नोव्हेंबर : व्यसनी रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे काळाची गरज आहे. यासाठी मुक्तीपथने सुरू केलेल्या गाव पातळी शिबिरातून रुग्णांना गावातच उपचार मिळत आहे. नुकतेच कुनघाडा माल, रोपी व इंदाराम येथे पार पडलेल्या शिबिराचा एकूण ५१ रुग्णांनी लाभ घेतला आहे.
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल येथील शिबिरात २२ रुग्णानी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री छत्रपती घवघवे तर समुपदेशन प्राजक्ता मेश्राम यानी केले. शिबिराचे आयोजन आनंद सिडाम , प्रियंका भूरले यांनी केले. यासाठी गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम रोपी या गावात गाव पातळी व्यसन उपचार क्लिनिकमध्ये १२ पेशंट ने उपचार घेतला आहे. नियोजन तालुका संघटक किशोर मालेवार , तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे , स्पार्क कार्यकर्ती रूणाली कुमोटी यांनी केले. यशस्वितेसाठी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य तथा गाव पाटील शत्रू नरोटे , भुमया धर्मा नरोटे , ग्रामसभा अध्यक्ष भाउजी नरोटे यांनी सहकार्य केले. अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे आयोजित शिबिरातून १७ पेशंट पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येल्लूरकर, समुपदेशन समुपदेशक साईनाथ मोहुर्ले यांनी केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक निलम मुळे, तालुका प्रेरक आनंदराव कुम्मारी व स्वप्नील बावणे यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी गावातील सरपंच हर्षा पेंदाम, प्रल्हाद पेंदाम, आशाताई पुष्पा आश्रम यांनी सहकार्य केले. अशा एकूण ५१ रुग्णांवर उपचार करण्यात आला.

#The Gadvishva #Gadchiroli #muktipath #Vyasan Upchar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here