जलयुक्त शिवार अभियान २.० : गडचिरोली जिल्ह्याकरिता १८४ गावांचे उद्दिष्ट

158

The गडविश्व
गडचिरोली, ३० एप्रिल : जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली असून सदर अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्या करिता १८४ गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सदर अभियान यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबद्ध रित्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे हा कार्यक्रम एक लोक चळवळ होणार आहे . विविध मृद व जलसंधारणाचे क्षत्रिय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या स्त्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे /उपचार गावात मोहीम स्वरूपात राबवून त्याचे अंमलबजावणी करणे करीता शिवार फेरीचे नियोजन आवश्यक आहे व त्यानुसार प्राथमिक आराखडे तयार करावयाचे आहेत .
ग्राम समितीच्या मान्यतेने गाव आराखडा करण्यात येईल. यामुळे सरपंच हे ग्राम समितीचे पदसिद्ध अध्यक्ष राहतील. ग्राम समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, महिला प्रतिनिधी, ग्रामसेवक व गावाशी संबंधित शासकीय क्षत्रिय कर्मचारी यांचा समावेश राहील. जलसंधारण अधिकारी व कृषी पर्यवेक्षक हे समन्वयक म्हणून काम पाहतील.

गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यातील गावांची संख्या

गडचिरोली – ८
धानोरा – १५
चामोर्शी – ११
मुलचेरा – ९
वडसा -१०
आरमोरी -१०
कुरखेडा – ९
कोरची -१०
अहेरी-१८
एटापल्ली – ५०
भामरागड -११
सिरोंच्या -२३
यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट असलेल्या अहेरी, ऐटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील कामांचा समावेश आहे.
शिवार फेरीला जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी व सर्व विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी हजर राहून गाव आराखडा तयार करणे बाबत सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली यांच्यामार्फत करण्यात आली आहे.

(the gdv) (the gadvishva) (muktipath serch gadchiroli) (gadchiroli news updates) (polis bharti 2023) (gadchiroli police bhharti certifacate) (Gadchiroli: Fake project certificate scam, eight more accused arrested)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here