– १८ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ३० एप्रिल : जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक पार पडली. जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या गडचिरोली व आरमोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पोरेड्डिवार गटाने वर्चस्व मिळविले असून संपूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला.
१८ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळवला असून जल्लोष साजरा करण्यात आला.
सहकार महर्षी अरविंदजी सावकार पोरेड्डिवार, जेष्ठ सहकार नेते प्रकाशजी सावकार पोरेड्डिवार यांच्या मार्गदर्शनात हे यश प्राप्त झाले आहे. गडचिरोली व आरमोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, सेवा सहकारी सोसायटी चे संचालक, सभासद, हमाल, व्यापारी या सर्वांचेच आमदार कृष्णा गजबे यांनी आभार मानले आहे.