The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : तालुक्यातील जेप्रा येथील किसान विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
ध्वजारोहन तसेच गुणवंत विद्यार्थि सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी, संस्थेचे अध्यक्ष पी.एन. पाटील मशाखेत्री हे होते. सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डायट शिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले, किसान विद्यालयाचे प्राचार्य एम.पी.म्हशाखेत्री, ग्रामपंचायत जेप्रा चे सरपंच शशिकला झंजाळ, उपसरपंच कुंदा लोनबले, शिक्षणसंस्थेचे सदस्य, विश्वनाथ निकुरे, विजया निरगुडे, सेवानिवृत्त शिक्षक वामन चौधरी, पालक संघाचे सदस्य अनील मेश्राम, पालक अजय वाढणकर, विश्वनाथ जेंगठे, दादाजी नरुले, कालीदास मानकर, जास्वंदा निकुरे, सुवर्णा कोडाप,दिलीप गावतुरे, दिलीप बावणे हे होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थी धनश्री गुरनुले, प्रियंका गावतुरे, नैना आदे, अनुष्का वाढणकर, प्रतीक जेंगटे, अनुष्का लाटेलवार यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी हजर होते, कार्यक्रमाचे संचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी तर आभार अरविंद ऊरकुडे यांनी मानले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )