मोहली ग्रामसभेने जि.प. शाळेला १२५ डेक्स, बेंच चा केला पुरवठा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १६ : तालुक्यातील मोहली येथील जि.प. शाळा शाळेला ग्रामसभेने १२५ डेस्क, बेंच चा पुरवठा केला आहे .
तालुक्यातील मोहली येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ५ वी पासून १२ वी पर्यंतचे वर्ग कार्यरत आहेत. सदर शाळेत परिसरातील आजूबाजूच्या लगतचे किमान १८ ते २० खेडेगावातील जवळपास ५०० च्या घरात विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मागील तीन वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालय सलग्नित झाल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स बेंच चा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. हि समस्या गावातील पालकांच्या कानावर पडल्या हि समस्या सोडविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधुन मदतीची विनंती केली. शालेय विद्यार्थ्यांची हि समस्या सोडविन्या बाबत ग्रामसभेत चर्चा केली. गावातील मुलामुलिनां हक्काचे डेस्क बेंच उपलब्ध करून देण्यासाठी मोहली येथील ग्रामसभेने शैक्षणिक विकासाचा भाग म्हणून एक महत्त्वपूर्ण ठराव पारित केला आणि ग्रामसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याचा निर्धार केला. शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याची गैरसोय होऊ नये याकरिता एकूण १२५ डेक्स बेंच (जोडी)खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी डेक्स बेंचची संख्या कमी असल्याने काही वर्गातील विद्यार्थी खाली मॅटवर बसत होते. दिलेल्या ऑर्डर नुसार ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी १२५ डेस्क बेंच शाळेत पोहोचता करुन दिले.
यावेळी ग्रामसभा अध्यक्ष गिरीधर पदा, ग्रामसभा सचिव रमेश पुंघाटे, ग्रामसभा सदस्य हेमंत मस्के, दीनदयाल गुरनुले, शरद लेनगुरे, विलास बोगा, कविता कुमरे, भारती शेजारे, श्यामकुवर गावडे, प्रतीक्षा कस्तुरे, प्रेमीला मोहुर्ले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
वर्गातील विद्यार्थ्यांनी नविन डेक्स बेंच पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे मन प्रफुलित झाले. सर्व विद्यार्थी खूप आनंदित झाले. शाळेचे प्राचार्य डी. जी. नरोटे यांचे सह सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ग्रामसभा पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार मानले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )