गडचिरोली पोलीस दलाने ५५ किमी पायी अभियान करत अतिसंवेदनशिल कत्रंगट्टा व पेनगुंडा येथे केले ध्वजारोहण

65

– पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण.
– अतिदुर्गम भागातील विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर हरघर तिरंगा मिरवणूका, क्रिडा स्पर्धांचे आयोजन व शालेय वस्तुंचे वाटप
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : ब्रिाटिशांपासून आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, म्हणून संपूर्ण भारत देशात १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील १७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व एक पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहिद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
विशेष बाब म्हणजे उपविभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा या गावात उपविभागीय पोलीस अधिकरी, भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पोस्टे धोडराज पार्टी, ०२ सी-६० पथक व ०१ सीआरपीएफ पथक यांनी २० किमी पायी अभियान करत ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात पोस्टे नारगुंडा पार्टी, ०२ सी-६० पथक व ०१ सीआरपीएफ पथक यांनी ३५ किमी पायी अभियान करत माओवादग्रस्त अतिसंवेदनशील अशा कत्रंगट्टा येथे भेट देवून गावक­ऱ्यांसोबत ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला. १३ मे २०२४ रोजी याच कत्रंगट्टा गावाच्या जंगल परिसरात माओवादयांसोबत झालेल्या चकमकीमध्ये एक डीव्हीसीएम (Divisional Committee Member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य व एक दलम सदस्य अशा एकुण ०३ जहाल माओवादयांना कंठस्नान घालण्यात व माओेवादयांचे संपुर्ण पेरमिली दलमचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते.
माओवादी अशा अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र गडचिरोली पोलीस दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावत १५ ऑगस्ट २०२४ रोजी दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोलीस मदत केंद्र येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांनी हरघर तिरंगा मोहिमेमध्ये देखील उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यासोबतच गेल्या एका वर्षभरात नव्याने उभारलेल्या पोस्टें वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा याठिकाणी देखील गावक­यांनी पोलीस दलासोबत स्वातंत्र्य दिन साजरा करत ध्वजारोहण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अतिदुर्गम भागातील युवकांसाठी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करुन सोबतच विद्याथ्र्यांसाठी शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्हयात विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर अतिदुर्गम भागांमध्ये गावक­यांच्या सहभागाने राष्ट्रध्वजासोबत मिरवणूका काढण्यात आल्या.
यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here