– अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा वनविभागास इशारा
The गडविश्व
मूलचेरा, दि. १६ : तालुक्यात नरभक्षक वाघाच्या धुमाकूळी ने सर्वत्र दहशत पसरली असून या वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार झाले तर काही इसम जखमी झाले. असे असतांना सुद्धा संबंधित विभाग काही ही हालचाल करतांना दिसून येत नाही. तात्काळ त्या नरभक्षक वाघास जेरबंद करून बंदोबस्त करावा अशी मागणी जि. प.माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी केले आहे तसेच बंदोबस्त न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा सुद्धा इशारा दिला आहे.
मूलचेरा तालुक्यातील मथुरानगर व कोडसापूर येथील दोन महिलांवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केले. त्या नरभक्षक वाघामुळे मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करणे आवश्यक असून वनविभागाने योग्य पाऊल उचलून आज सद्यकाळ पर्यंत वाघाचा बंदोबस्त करणारे पथक जर पोहचलेली आढळून आली नाही तर समस्त शेतकरी व नागरिकांसह १७ जानेवारी म्हणजेच उद्या सकाळी १०.३० वाजता DFO कार्यलयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली आहे.