गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची पर्वणी
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
सकाळी ९.०० वाजता
स्थळ : जवाहर नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर, गडचिरोली
उपक्रम : शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
आयोजक : शहर काँग्रेस कमिटी, गडचिरोली
सकाळी १०.०० वाजता
स्थळ: सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, गोकुलनगर, गडचिरोली
उपक्रम : शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
आयोजक : तालुका काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग), गडचिरोली
सकाळी ११.०० वाजता
स्थळ: जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली
उपक्रम : रुग्णांना फळवाटप
आयोजक : महिला काँग्रेस कमिटी, गडचिरोली
दुपारी १२.०० वाजता
स्थळ : जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली
उपक्रम : ‘मदतीचा घास’ उपक्रमांतर्गत भोजनदान
आयोजक : मित्रपरिवार
याशिवाय, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आणि विविध गावांमध्ये रक्तदान, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णसेवा आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









