एक लाख विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक ; समाजोपयोगी उपक्रमांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस साजरा

9

एक लाख विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक ; समाजोपयोगी उपक्रमांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस साजरा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसानिमित्त लोकसभा क्षेत्रातील एक लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयासह विविध तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा महिला रुग्णालयात भोजनदानाचा उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश देण्यात आला.
गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा (रामनगर), नगरपरिषद शाळा (रामपुरी), सावित्रीबाई फुले शाळा (गोकुळनगर) तसेच भगवंतराव प्राथमिक व कनिष्ठ विद्यालय (गोकुळनगर) येथे विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. याशिवाय संपूर्ण गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णसेवा, भोजनदान आणि शैक्षणिक साहित्य वितरणाचे उपक्रम उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला महेंद्र ब्राह्मणवाडे, मनोहर पाटील पोरेटी, सतीश विधाते, समशेरखान पठाण, प्रभाकर वासेकर, श्रीकांत देशमुख, मेघा वरगंटीवार, सुनील चडगुलवार, माधव गावड, अब्दुलभाई पंजवाणी, वामनराव सावसाकडे, वसंत राऊत, दिवाकर निसार, संजय मेश्राम, ढिवरू मेश्राम, नदीम नाथानी, अनिल कोठारे, राहुल वैरागडे यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय तसेच विविध विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास आणि शेतकरी कल्याणासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा उल्लेख करत, वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याची परंपरा भविष्यातही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here