बामणीच्या जंगलात गळफास; तीन-चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

56

बामणीच्या जंगलात गळफास; तीन-चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १८ : पुराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणी गावाजवळील जंगल परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसमाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मृताची ओळख खेमेंद्र काशीनाथ पोटावी (वय ४०, रा. आझाद वॉर्ड, कुरखेडा, जि. गडचिरोली) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेमेंद्र पोटावी याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. बामणी परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे.

या प्रकरणी पुराडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण तसेच घटनेमागील परिस्थितीचा पोलीस तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here