मुक्तिपथ तालुका क्लिनिकला उत्तम प्रतिसाद

447

The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी मुक्तिपथ तर्फे तालुका पातळीवर व्यसन उपचार तालुका क्लिनिकची सुविधा उपलब्ध आहे. या क्लिनिकला रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असून मागील आठवड्यात विविध तालुक्यातील एकूण ३३ रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना उपचार घेणे सोपे व्हावे, यासाठी मुक्तिपथ तर्फे जिल्हाभरातील बाराही तालुका मुख्यालयी नियोजित दिवशी व्यसन उपचार तालुका क्लिनिक सुरु आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त झाले आहेत. या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना योग्य औषधोपचारासह समुपदेशन देखील केले जाते. तसेच एकदा उपचार घेतलेल्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा देखील घेतला जातो. त्यामुळे दारूचे व्यसन सोडण्यासाठी रुग्णांना योग्य ती मदत होते. मागील आठवड्यात एटापल्ली तालुका क्लिनिकला १०, आरमोरी ९. सिरोंचा ६ व धानोरा तालुका क्लिनिकला एकूण ८ रुग्णांनी भेट देत व्यसन उपचार घेतला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #World Blood Donor Day (WBDD) #sachinjiotode #akashamborkar #charudattraut #swayamraktdatasamiti #Oman vs England #Papua New Guinea vs Afghanistan #Tamilisai Soundararajan #JKBOSE 10th Result 2024 #Kuwait #Bridgerton #Florida weather # )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here