घरघुती दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी होणार प्रयत्न

42

The गडविश्व
गडचिरोली, ,दि. १४ : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या चोकेवाडा येथे मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सघन गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अवैध दारूबंदी कायम ठेवण्यासह घरगुती दारूचे प्रमाण कमी करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
चोकेवाडा येथे मागील अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारची दारु विक्री केली जात नाही. परंतु आदिवासी परंपरेनुसार घरगुती दारू काढली जाते. यातूनच व्यसन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच गावात मुक्तिपथ व गाव संघटनेच्याव संयुक्त विद्यमाने सघन गाव भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी घरगुती दारूचे वापर कमी करणे आणि गावात कोणत्याही प्रकारची दारु विक्री करू नये, लहान मुलांना खर्रा, तंबाखू विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू पासून वाचवावे असे आवाहनही करण्यात आले.
सघन गाव भेटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी युवती बैठक, महिला बैठक, स्तनदा माता, गरोदर माता अशा सर्व महिलांना बोलून बैठक घेण्यात आली. यावेळी आपले आरोग्य कसे जपले पाहिजे, युवतीने व्यसन करू नये, वैवाहिक जीवनात व्यसनाचे कोणते दुष्परिणाम होतात यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील पोलिस पाटील रवि दुर्गु नरोटे, गाव पाटील मगडू लिंगु नरोटे, बंडू सोमा नरोटे भुमया , ज्योती तुळशीराम उसेंडी आशा वर्कर , शैलेश्टिंगा पोलुश कुजुर अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या सघन गाव भेटीमध्ये मुक्तिपथचे वैरागडे यांनी मार्गदर्शन केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #World Blood Donor Day (WBDD) #sachinjiotode #akashamborkar #charudattraut #swayamraktdatasamiti #Oman vs England #Papua New Guinea vs Afghanistan #Tamilisai Soundararajan #JKBOSE 10th Result 2024 #Kuwait #Bridgerton #Florida weather # )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here