अवैध दारू व तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा

109

– ‘मुक्तिपथ’ तालुका समितीच्या अध्यक्षांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : मुलचेरा तालुक्यातील ग्रामीण, दुर्गम भागातून अवैध दारूविक्रीसह सुगंधित तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश तहसिलदार तथा मुक्तिपथ अभियान तालुका समितीचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी दिले.
‘मुक्तिपथ’ दारू व तंबाखू मुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका समिती बैठक घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रभारी पोलिस अधिकारी अशोक भापकर, विस्तार अधिकारी ए.टी.खेवले, गटशिक्षण अधिकारी धनंजय कांबळे, नगरपंचायतचे जगदीश वाढई, गट समन्वयक विलास श्रीकोंडावार, समुपदेशक प्रफुल पाल, वनपाल टी.बी. लेनगुरे, गौतम अमृतवाणी, रवींद्र मोहुर्ले, महसूल सहायक बी.पी. जल्लेवार, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्त्या समीक्षा कुळमेथे उपस्थित होते.
बैठकीत पोलीस विभाग यांना दारूविक्री असलेल्या गावातील दारू विक्रेत्यांवर योग्य ती कार्यवाही करून अवैध दारू विक्री बंद करणे, वन विभाग यांना दारू विक्री करीत असलेल्या गावातील जंगल परिसरामध्ये अवैद्यरित्या दारू काढून दारू विक्री करणाऱ्यांवर समितीद्वारा योग्य ती कारवाई करणे. ग्रामपंचायत / नगर पंचायत अंतर्गत पथक तयार करून पानठेले, किराणा दुकानात अवैध तंबाखू विक्री / दारू विक्री साठी दंडात्मक कार्यवाही करून तसा अहवाल सादर करणे. शासकीय सर्व कार्यालयामध्ये कर्मचारी व इतर कुणीही तंबाखूजन्य पदार्थ सेवन करीत असताना आढळल्यास संबधित विभाग प्रमुखाने तसेच आरोग्य विभाग तंबाखू नियंत्रण पथकद्वारे दंडात्मक कारवाई करणे. शाळेच्या १०० यार्ड परिसरातील सर्व पानठेले हटविणे. अशा विविध विषयावर चर्चा करून ठराव पारित करून सबंधित विभागातील प्रमुखांना आदेश देण्यात आले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #World Blood Donor Day (WBDD) #sachinjiotode #akashamborkar #charudattraut #swayamraktdatasamiti #Oman vs England #Papua New Guinea vs Afghanistan #Tamilisai Soundararajan #JKBOSE 10th Result 2024 #Kuwait #Bridgerton #Florida weather # )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here