अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता

507

– न्यायालयासाठी पदनिर्मितीही होणार
The गडविश्व
गडचिरोली, ५ फेब्रूवारी : राज्यातील विविध ठिकाणी न्यायालय सुरु करण्यासाठी प्रलंबित खटले / प्रकरणांची संख्या किमान ५०० असावी हा निकष पूर्ण होत नसला तरीही भौगोलिक अंतर, पायाभूत सुविधा उदा. न्यायालयीन इमारती इ. ची उपलब्धता असावी या मा. उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार आवश्यक इतर सर्व निकष सकृतदर्शनी पूर्ण होत असल्याचे दिसून येत असल्याने मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडून अहेरी, जिल्हा गडचिरोली येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश यांचे न्यायालय स्थापन करण्यास खास बाब म्हणून शिफारस करण्यात आली . त्या अनुषंगाने अहेरी, जिल्हा गडचिरोली येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात देण्यात आली आहे. तसेच, या न्यायालयासाठी विविध पदे निर्माण करण्यास आणि बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
नव्याने निर्माण केलेली १७ पदे व बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ ६ असे २३ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सफाईगार, पहारेकरी / सुरक्षारक्षक या पदांची कामे आवश्यकतेनुसार बाह्ययंत्रणेद्वारे करुन घेण्यात यावी. बाह्ययंत्रणेद्वारे कामे करुन घेताना वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन करण्यात यावे. उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथमत: २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे शासन मंजूरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना २८ फेब्रुवारी, २०२३ नंतर पुढील मुदतवाढ घेणे आवश्यक राहील.
यासाठी होणारा खर्च संबंधित आर्थिक वर्षात निधिची तरतुद करुन “मागणी क्रमांक जे १, २०१४- न्यायदान (००) (१०५) दिवाणी व सत्र न्यायालये (०२) जिल्हा व सत्र न्यायाधिश (०२) (०१) जिल्हा व सत्र न्यायाधिश (२०१४ ०१७२) दत्तमत” या लेखाशीर्षाखालील उद्दीष्टांसाठी अंतिमत: खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय, मा. मंत्रीमंडळाच्या २२ डिसेंबर, २०२२ रोजीच्या बैठकीत झालेल्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २५/२०२३ / आपुक, १८.०१.२०२३ व अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८७९/२०२२ / व्यय ५, २१.१२.२०२२ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Vani Jayaram) (Everton vs Arsenal) (Man United vs Crystal Palace) (Wolves vs Liverpool) (JEE Mains Answer Key 2023) (Chelsea) (Government approves setting up District and Additional Sessions Court at Aheri)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here